Tuesday, May 10, 2011

देव-देवतांची विटंबना थांबवा

हिंदूंची आराध्य दैवत असलेल्या लक्ष्मीमातेची छायाचित्रे असलेले स्विमसुट लिसा ब्लू ने फॅशन शो मध्ये पेश केली.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील फॅशन विक मध्ये ही तोकडी परिधाने घालून मॉडेल्स रॅम्पवर अवतरल्या होत्या. यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली, या परिधानांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या  गेल्याने  नंतर कंपनीने माफी मागितली, पण तोपर्यंत फोटो व युट्यूब क्लीप इंटरनेट वर आल्या, त्यांचे काय? आजकाल प्रसिद्धीसाठी कुणीही उठतो हिंदूंच्या भावनेशी खेळतो, जनक्षोभ उसळला कि नंतर माफी मागून मोकळा होतो. राजकारणी तेवढ्या पुरते राजकारण करतात नंतर शांत, याला कुठे तरी आळा घातला पाहिजे, हिंदूच काय तर कुठल्याही धर्माच्या देवतांची विटंबना करणार्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, तसा कायदा नसेल तर कायद्यात बदल करायला हवा. आणि तसे झाले तरच असे दुष्कृत्य करायला कुणीहि धजावणार नाही. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठी हा अट्टाहास.
आपणाला जर आपल्या थोर आणि प्राचीन संस्कृतीची काळजी असेल तर हा मेसेज तुमच्या मित्रांना पाठवून  या जनजागृतीत आपलाही हातभार लागू द्या.