Wednesday, July 3, 2013

नैसर्गिक आपत्ती कि मानवाने ओढावून घेतलेले संकट


आज पर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासात उत्तराखंड राज्यात प्रथमचएवढा मुसळधार पाऊस झाला, ढगफुटीने हाहाकार माजला आहे. केदारनाथ मंदिर परिसरात फक्त मंदिर सुरक्षित असून आसपास असणारे मठ, हॉटेल, यात्रेकरूंचे निवासस्थाने सारं काही उद्धवस्त झाले आहे. अतिशय भयंकर अवस्था आहे. त्या ठिकाणी मृतदेहांचा खच साचला आहे. गंगेला आलेल्या पुराच्या लोंढ्याने शेकडो नागरिक वाहून गेले. शेकडो गावे उद्धवस्त झाली आहेत. लष्कराचे बचावकार्य सुरू आहे. आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र अंतर्गत हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
पण या आपत्तीला निसर्ग जबाबदार नाही तर माणूसच जास्त जबाबदार आहे. विकास कामांसाठी सुरुंग लावून खोदकाम करून अख्खे डोंगरचे डोंगर पोखरले जातात, हिमालयाला ठिसूळ करण्याचे काम हि लोक करीत असतात, त्यांना माहित नाही विकासाच्या नावाखाली आपण विनाश ओढवून घेत आहोत   
निसर्गाशी खेळ केला तर तो असा खेळ करतो कि माणसाचा मी पणा विरून जातो. 
निसर्गा पुढे माणूस शुन्य आहे हे विसरता कामा नये. विकासाच्या नावाखाली निसर्गाला आव्हान देऊ पाहणारी अवैध बांधकामे थांबवा अन्यथा होत्याच नव्हत करायला निसर्गाला वेळ लागणार नाही. 
झाडे लावावीत, नैसर्गिक साधन-संपत्तीचे जतन करावे, निसर्गाची सुंदरता टिकून ठेवण्यासाठी उपक्रम राबवावेत. जेणेकरून निसर्ग प्रसन्न होवून त्याची कृपा आपल्यावर कायम राहील. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची आज खरी गरज आहे. 
 

No comments:

Post a Comment