उद्या १५ ऑगष्ट, भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिन, सकाळ
पासून संद्याकाळ पर्यंत विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतील अनेक जण भाषणे ठोकतील.
त्यामुळे म्हटलं आपणही काहीतरी लिहावं भारत स्वतंत्र होवून
६७ वर्षे झाली. आपल्याला खरच स्वातंत्र्य मिळालंय का यावर मी चर्चा करणार नाही किंवा भारतात खूप corruption आहे यावरही मी बोलणार नाही कारण आपण जर काही देशासाठी
करत असू तर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे,
भ्रष्टाचार
मुक्त करण्यासाठी काही करत असू तर बोलण्याला अर्थ आहे. मी तर म्हणेल जो देशासाठी काही
चांगलं करत नाही त्याला भारत देशावर, इथल्या system वर बोलण्याचा काही एक अधिकार नाही,
नावे ठेवण्याचा अधिकार नाही. जे लोक
corruption वर, इथल्या लोकशाहीवर बोलतात त्यांना नावे ठेवतात तेच लोक मतदानाच्या दिवशी
holiday समजून कुठेतरी पिकनिक करायला जातात त्यांना काय अधिकार बोलण्याचा. आणि एक सांगून
ठेवतो माझा भारत देश महान होता, महान आहे व महानच राहणार. स्वताची आई कितीही कुरूप
असली तरी आई हि आईच असते. तिची जागा कुणीही घेवू शकत नाही.
दिवसमान
खराब आहेत, पाऊस नाही, पीक पाणी नाही, बाजार मंद आहेत, अर्थव्यवस्थेचा विचार केला तर
चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या द्वैमासिक पतधोरणात रिसर्व बंकेने रेपो दर ८ % आणि रोख राखीव प्रमाणात बदल केला नाही म्हणजेच अर्थव्यवस्था विकासाच्या
दिशेने वाटचाल करण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत, गरीब आणि मध्यमवर्गाचा संबंध असलेली
महागाई हटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. उलट अजून काही काळ अशीच चिंता करावी लागणार
असल्याची कबुली गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. याला भरपूर कारणे आहेत मी जास्त खोलात
जात नाही. सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहे आपण आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत
त्यासाठी
आपल्याला काय करता येईल? साधे राहा, जास्त खर्च करू नका, गरज असतील त्याच वस्तू घ्या,
विनाकारण कर्ज घेवू नका. मी यात आणखी एक गोष्ट add करील "स्वदेशी वापरा".
याने महागाई कमी होईल? नक्कीच महागाई कमी व्हायला मदत होईल, कशी ते मी सांगतो.
स्वदेशी
चा विचार ही संकल्पना नवी नाही. परंतु अजूनही तिचा म्हणावा तसा प्रचार-प्रसार
झालेला नाही.
आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी म्हणजे टूथपेस्ट, अंघोळीचा साबण, भांड्यांचा साबण, कपड्यांचा साबण, बिस्किटे, सौंदर्यप्रसाधने, चहा-कॉफी, शीतपेये वगैरे. या गोष्टी खरेदी करत असताना आपण नक्की कोणत्या गोष्टींचा तुलनात्मक विचार करून ठराविक उत्पादन ठरवतो? बारकाईने विचार केला तर असं दिसून येतं की २ गोष्टी प्रामुख्याने वस्तूंच्या निवडीमागे असतात- एक म्हणजे 'मला आवडतं म्हणून' आणि दुसरं म्हणजे 'जाहिरातीत दाखवतात म्हणून'. दुसरी गोष्ट सहजी कोणी मान्य करत नाही. परंतु उत्पादन निवडीमागे जाहिरातीचा मारा आणि आपल्या सुप्त मनामध्ये (sub conscious mind) त्या जाहिरातीचा असलेला परिणाम!
आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी म्हणजे टूथपेस्ट, अंघोळीचा साबण, भांड्यांचा साबण, कपड्यांचा साबण, बिस्किटे, सौंदर्यप्रसाधने, चहा-कॉफी, शीतपेये वगैरे. या गोष्टी खरेदी करत असताना आपण नक्की कोणत्या गोष्टींचा तुलनात्मक विचार करून ठराविक उत्पादन ठरवतो? बारकाईने विचार केला तर असं दिसून येतं की २ गोष्टी प्रामुख्याने वस्तूंच्या निवडीमागे असतात- एक म्हणजे 'मला आवडतं म्हणून' आणि दुसरं म्हणजे 'जाहिरातीत दाखवतात म्हणून'. दुसरी गोष्ट सहजी कोणी मान्य करत नाही. परंतु उत्पादन निवडीमागे जाहिरातीचा मारा आणि आपल्या सुप्त मनामध्ये (sub conscious mind) त्या जाहिरातीचा असलेला परिणाम!
स्वदेशी वस्तूंची संकल्पना नक्की काय आहे? कोणते उत्पादन स्वदेशी? भारतात बनवले गेलेले ते स्वदेशी आणि आयात केलेले (imported) ते विदेशी अशी सामान्यतः समजूत असते. परंतु हा समज चुकीचा आहे. भारतात बनवली गेलेली वस्तूही विदेशी असू शकते. उदा. कोलगेट चा कारखाना भारतात आहे, त्यात कच्चा माल भारतातलाच वापरला जातो. भारतीय कामगार काम करतात आणि तयार माल हा भारतातच भारतीय व्यापारी वर्गातर्फे भारतीयांना विकला जातो. तरीही हे उत्पादन स्वदेशी नाही! याचं कारण ‘ते उत्पादन विकले गेल्यानंतर त्यापासून होणारा फायदा हा कुठे जातो' हे आहे. ह्यातून आपल्या कामगारांचा, व्यापारीवर्गाचा फायदा होतो ही गोष्ट खरी असली तरीही अंतिम नफा हा विदेशस्थित कोलगेट कंपनी ला होतो. आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत तो पैसा जातो. म्हणून हे उत्पादन विदेशी!
विदेशी
उत्पादन का घेऊ नये, तर त्यावर आपण खर्च केलेल्या पैशाचा हिस्सा म्हणजेच
पर्यायाने आपला पैसा परदेशात जातो. तेथील विकासकामांसाठी, संरक्षण सिद्धतेसाठी
त्याचा वापर होणार म्हणून. आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रचंड पैशाच्या जोरावर
सुरुवातीची किंमत अत्यंत स्वस्त ठेऊन स्वदेशी कंपन्या विकत तरी घेतात किंवा बंद
तरी पाडतात. उत्तम उदाहरण ’थम्स अप’ चे आहे. ’थम्स अप’ हे उत्पादन सुरुवातीला ’पार्ले
जी’ चे होते. कोका कोलाने अत्यंत कमी किंमत ठेऊन पार्ले ला आपले उत्पादन बंद
करावयास भाग पाडून ते शेवटी विकत घेतले. आणि आज कोका कोलाच्या बरोबर किंमतीने ते
बाजारात आहे! त्यामुळे थोडा दूरदृष्टीचा विचार करून आपण विदेशी उत्पादनांचा मोह
टाळावयास हवा. माझा विरोध globalization ला नाही, पण त्या मुळे भारतीय उद्योगावर जो
विपरीत परिणाम होतो त्याला आहे.
दुसरा
युक्तिवाद हा सहाजिकच किंमतीबद्दल असतो. स्वदेशी उत्पादने महाग असतात हा
जाणीवपूर्वक पसरविण्यात आलेला गैरसमज. आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या
किंमतींचा तुलनात्मक अभ्यास केला असता काय दिसते? विम बार च्या तुलनेत ओडोपिक बार
स्वस्त आहे. आज कपडे धुलाईच्या साबणासाठी अनेक भारतीय पर्याय उपलब्ध आहेत. परंतु
एरीअल, रिन, व्हील यांच्या प्रचारामुळे स्वदेशी उत्पादनेच पुढे येत नाहीत.
किंबहुना कधीकधी असे लक्षात येते की त्या विशिष्ट वस्तूला कंपनीच्या नावानेच ओळखले
जाऊ लागले आहे. उदा. भांड्याचा साबण म्हणजेच विम बार! मग कोणत्याही कंपनीचा असो,
कामकरी वर्ग त्यास विम बार म्हणूनच ओळखतो. म्हणजे 'ओडोपिक चा विम बार आणला आहे
वाटतं!' अशी परिस्थिती होते.
स्वदेशी
उत्पादनांच्या वरील हे स्फुट बाबू गेनू , स्वा. सावरकर व गांधीजी यांच्याशिवाय
पूर्ण करता येणार नाही. लोकांनी आपल्याकडील विदेशी वस्तू आणाव्यात, त्या अग्नीला
समर्पित कराव्यात आणि पुन्हा विदेशी वस्तू वापरू नयेत हा 'विदेशी मालाच्या
होळीमागील मुद्दा होता.
बाबू
गेनूला जेव्हा समजले की, भारतातील कच्च्या मालाचा वापर करून तयार करून आणलेल्या
विदेशी उत्पादनांचा साठा बंदरावर येत आहे, तेव्हाच त्याने तयारी केली. जेव्हा
बंदरातून विदेशी मालाने भरलेले हे ट्रक बाहेर पडू लागले तेव्हा बाबू गेनुने ते
अडवण्यासाठी त्याच्या मार्गात स्वतःला झोकून दिले. ट्रक थांबला कारण त्याचा चालक
विठ्ठल धोंडू हा भारतीयच होता. थोडा ट्रक पुढे नेऊन भीती दाखविण्याचा प्रयत्न केला
गेला, परंतु क्रांतिकारकाला कसले मृत्यूचे भय! बाबू तसाच अविचल राहिला. विठ्ठल
च्या बाजूला बसलेल्या इंग्रज सार्जंट ने ट्रक पुढे नेण्याचा आदेश दिला. परंतु
विठ्ठल चे मन निबर नव्हते. त्याने साफ नकार दिला. त्या उद्दाम इंग्रज सार्जंट ने
स्वतः ट्रक चा ताबा घेतला व माणुसकीला लाजवेल अशा कृत्याची नोंद इतिहासात झाली.
ट्रक बाबुला चिरडून पुढे निघून गेला. बाबूने बलिदान दिले. त्या बलिदानाची आठवण
म्हणून एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. परंतु त्याने ज्यासाठी बलिदान
केले त्याचे काय? आजही स्वदेशीचा विचार जनमानसात पोहोचविण्याची गरज आहे.
आजच्या
या मंगल दिनी आपण सर्वांनी एवढ जरी ठरवल कि या नंतर मी फक्त स्वदेशी
उत्पादनेच विकत घेईल, विदेशी उत्पादने घेणार नाही तरी बाबू गेनूचे बलिदान सार्थ झाले
असे मी समजेल. एवढे बोलून मी आपली रजा घेतो.
जय
हिंद! जय महाराष्ट्र!!
No comments:
Post a Comment